गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार

0
26
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार

मुंबई, दि. १५ : यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी साजरी होत असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे आरक्षणासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचण्याची इच्छा असलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या आगाऊ आरक्षण नियमांनुसार प्रवाशांना प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी ऑनलाइन तिकीट आरक्षित करता येते. त्यानुसार ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठीचे आरक्षण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याने इच्छुक प्रवाशांनी वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे.
यंदा १७ सप्टेंबर रोजी गौरी आगमन तर १८ सप्टेंबर रोजी गौरी पूजन होणार असल्याने या कालावधीतही कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या दिवसांसाठीही तिकिटांना मोठी मागणी राहण्याची शक्यता आहे.
दरवर्षी गणेशोत्सव काळात नियमित गाड्यांमधील आरक्षण काही मिनिटांत पूर्ण होत असल्याने अनेक प्रवाशांना गणपती विशेष गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. यंदाही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून रेल्वे प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here