‘लम्पीमुक्त महाराष्ट्र’साठी पशुसंवर्धन विभागाची मोठी मोहीम

0
23
'लम्पीमुक्त महाराष्ट्र'साठी पशुसंवर्धन विभागाची मोठी मोहीम
'लम्पीमुक्त महाराष्ट्र'साठी पशुसंवर्धन विभागाची मोठी मोहीम

‘लम्पीमुक्त महाराष्ट्र’साठी पशुसंवर्धन विभागाची मोठी मोहीम

गोधनाच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर लसीकरण

मुंबई : राज्यातील गोवंशाला लम्पी त्वचारोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘लम्पीमुक्त महाराष्ट्र’ अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील गोवंशाचे युद्धपातळीवर लसीकरण करण्यात येत असून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
लम्पी त्वचारोगामुळे पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने जिल्हानिहाय विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून गावागावांत जाऊन जनावरांचे लसीकरण केले जात आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे गोवंशाचे संरक्षण होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासही हातभार लागणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे तसेच लम्पीची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here