थळ-नवगाव मच्छीमारांच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा

0
45
थळ-नवगाव मच्छीमारांच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा
थळ-नवगाव मच्छीमारांच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा

थळ-नवगाव मच्छीमारांच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा

जेट्टी व संरक्षण बंधारा कामांना गती देण्याच्या सूचना

मुंबई : रायगड जिल्ह्यातील थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आर.सी.एफ. कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक चॅनेल निर्मिती, संरक्षण बंधारा उभारणी तसेच मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत संबंधित कामे प्राधान्याने आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. किनारी भागातील मच्छीमारांच्या सुरक्षिततेसह मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी विविध उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला.
याशिवाय मौजे नवेदार-नवगाव येथील प्रस्तावित मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे स्थानिक मच्छीमार, प्रवासी आणि पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
या बैठकीस आमदार महेंद्र दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, तसेच आर.सी.एफ. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here