हाफकिन संस्था आणि ‘चक्र’मध्ये सामंजस्य करार; आरोग्य संशोधनाला मिळणार नवी दिशा

0
19
हाफकिन संस्था आणि ‘चक्र’मध्ये सामंजस्य करार; आरोग्य संशोधनाला मिळणार नवी दिशा
हाफकिन संस्था आणि ‘चक्र’मध्ये सामंजस्य करार; आरोग्य संशोधनाला मिळणार नवी दिशा

हाफकिन संस्था आणि ‘चक्र’मध्ये सामंजस्य करार; आरोग्य संशोधनाला मिळणार नवी दिशा

क्लिनिकल ट्रायल्स, जीनोमिक्स आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात संयुक्त संशोधनाला चालना

मुंबई : राज्यातील आरोग्य संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागांतर्गत कार्यरत सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी (चक्र) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत प्राध्यापक विकास, क्लिनिकल ट्रायल्स, जैववैद्यकीय संशोधन, ट्रान्सलेशनल मेडिसिन, जीनोमिक्स, सार्वजनिक आरोग्य तसेच क्षमता विकास या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये दोन्ही संस्था संयुक्तपणे कार्य करणार आहेत. यामुळे आरोग्य संशोधनाच्या गुणवत्तेत वाढ होऊन नव्या संशोधन संधी उपलब्ध होणार आहेत.
तसेच संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम, प्राध्यापकांची देवाण-घेवाण आणि संशोधनासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचा परस्पर वापर यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील नवोन्मेषाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव धीरज कुमार, ‘चक्र’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार, मुख्य प्रशासकीय अधिकारी ब्रिगेडियर मुलगुंद, हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात, मुख्य प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, सहाय्यक संचालक डॉ. उषा पद्मनाभन, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. वृषाली पाटील तसेच प्रशिक्षण विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here