वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

0
24
वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त
वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

वडाळ्यात इंधन चोरी रॅकेटचा पर्दाफाश; १.३१ कोटींचा मुद्देमाल जप्त

पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन चोरीप्रकरणी धडक कारवाई; एक जण ताब्यात

मुंबई : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने वडाळा परिसरात धडक कारवाई करत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन (ATF) चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जून २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. छाप्यामध्ये दोन इंधन टँकरचे सील तोडून त्यामधील इंधन प्लास्टिक कॅनमध्ये भरून चोरी केली जात असल्याचे उघडकीस आले.
तपासणीदरम्यान एमएच-०४ केयू-१८२६ या टँकरमध्ये १० हजार लिटर पेट्रोल आणि १४ हजार लिटर डिझेल, तर एमएच-०४ एलवाय-६३८८ या टँकरमध्ये २९ हजार लिटर विमान इंधन (ATF) आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या इंधनासह टँकर आणि अन्य साहित्याचा एकूण मुद्देमाल सुमारे १.३१ कोटी रुपये इतका आहे.
या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून इंधन चोरीच्या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here