सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी IAS अश्विन मुद्गल
पदभार स्वीकारला
नवी मुंबई : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नियोजन प्राधिकरणांपैकी एक असलेल्या सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी IAS अधिकारी अश्विन मुद्गल यांनी मंगळवार, १७ जून २०२६ रोजी पदभार स्वीकारला. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनातील मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे पदाची सूत्रे हाती घेतली.



