रत्नागिरी मध्ये २४ जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

0
24
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे अभ्यागत अध्यापक पदासाठी ८ जुलै रोजी मुलाखत
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे अभ्यागत अध्यापक पदासाठी ८ जुलै रोजी मुलाखत

रत्नागिरी मध्ये २४ जून रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 

रत्नागिरी –
जिल्हातील सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार २४ जून रोजी सकाळी १०.०० वाजता, स्थळ – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, पो. एमआयडीसी, ता. जि. रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी.
नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे.

२४ जून २०२६ रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

या रोजगार मेळावा मध्ये सहभागी होणेसाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरित प्रत्यक्ष अथवा या कार्यालयाचा दूरध्वनी क्र.(०२३५२)२९९३८५ वर संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र.मोरेश्वर दुधाळ, यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here