मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू

0
20
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू

अधिक जलद, पारदर्शक आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेकडे विकसित महाराष्ट्राचे आणखी एक पाऊल

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून मदतीसाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे अर्जदारांना घरबसल्या अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढून रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि रुग्णकेंद्रित करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देणारे हे आणखी एक आश्वासक पाऊल असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here