पुणे–संगमनेर–नाशिक रेल्वे प्रकल्प अखेर रद्द

0
24
पुणे–संगमनेर–नाशिक रेल्वे प्रकल्प अखेर रद्द
पुणे–संगमनेर–नाशिक रेल्वे प्रकल्प अखेर रद्द

पुणे–संगमनेर–नाशिक रेल्वे प्रकल्प अखेर रद्द

खेड-आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेरच्या विकासाला मोठा धक्का; नागरिकांमध्ये संतापाची लाट

पुणे–संगमनेर–नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल तीन दशकांपासून चर्चेत असलेला हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प अखेर रद्द करण्यात आल्याची औपचारिक घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. जीएमआरटी (GMRT) ने तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प पुढे नेणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले असून, या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर तालुक्यांतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तीन दशकांपासून खेड आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर तालुक्यांच्या लोकांनी या मार्गाची वाट पाहिली होती.
त्या काळात स्थानिक नेत्यांनी आणि सरकारने ‘विकास होईल’ अशी मोठी आश्वासने देत मत मागितले; लोकांनीही स्वप्न पाहिले – शेतीपिक शहरांपर्यंत सहजपणे जाण्यामुळे उत्पन्न वाढेल, उद्योगधंदे वाढतील आणि जमीनदर वाढतील.परंतु आता, सर्व आशा तुटल्यासारखं झालं आहे. प्रकल्प रद्द झाल्याने अनेकांचा विश्वास कोसळला आहे आणि स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला आहे
शेतीमालाला बाजारपेठ, औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि दळणवळणाची नवी संधी मिळेल या अपेक्षेने या भागातील जनतेने अनेक वर्षे या रेल्वेमार्गाची वाट पाहिली होती. मात्र प्रकल्प रद्द झाल्याने विकासाच्या आशा मावळल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून, या निर्णयावरून आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
या घटनेमुळे राजकारणातही गदारोळ वाढला असून, या प्रकल्पावरून सत्ताधारी-प्रतिस्पर्धी नेते आणि माजी आमदार, खासदार यांची भूमिका आता चर्चेचा विषय बनली आहे. अनेकांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि राजकीय जबाबदारीची मागणी सुरु केली आहे. या घटनेत प्रभावित भागातील अनेक शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक आता काय अपेक्षा ठेवतील हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच, पुढे या निर्णयाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतील आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने पर्यायी उपाय काय असू शकतात, हे लक्षात घेण्यास हवं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here