कलावंत, कलारसिक आणि अभ्यागतांच्या सहभागाने रंगला सर्जनशीलतेचा सोहळा
मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे २ ते १५ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘जेजेइट्स आर्ट शो २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत संस्था ‘जेजेइट्स’च्या वतीने आयोजित या प्रदर्शनाला कलाकार, कलारसिक आणि अभ्यागतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रदर्शनातून विविध कलाकृतींच्या माध्यमातून सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार अनुभवायला मिळाला. कलाकारांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देतानाच कला आणि समाज यांच्यातील अर्थपूर्ण संवाद अधिक दृढ करण्याचे कार्य या प्रदर्शनाने केले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी कलाकार, मार्गदर्शक, समर्थक आणि कला प्रेमींचे जेजेइट्स टीमने आभार मानले.
प्रदर्शन संपले असले तरी या कलासोहळ्याच्या आठवणी आणि त्यातून निर्माण झालेली प्रेरणा दीर्घकाळ रसिकांच्या मनात कायम राहणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.