एसटीच्या उत्पन्नात १५ दिवसांत ४३.८३ कोटींची वाढ ; अवैध वाहतुकीवर लगाम
एसटीच्या उत्पन्नात १५ दिवसांत ४३.८३ कोटींची वाढ ; अवैध वाहतुकीवर लगाम
कठोर कारवाईमुळे दररोज सुमारे ३ कोटी रुपयांची अतिरिक्त महसूलवाढ
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात तब्बल ४३ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या कठोर कारवाईमुळे एसटीला दररोज सरासरी तीन कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
अवैध वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या महसुलावर मोठा परिणाम होत होता. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे तपास मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेमुळे प्रवाशांचा ओढा पुन्हा एसटीकडे वाढल्याचे दिसून येत आहे.
महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी अवैध वाहतुकीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.