उरणमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान व विविध योजनांची माहिती
रायगड जिल्हा परिषद कृषी विभाग आणि उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे गुरुवारी तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषीपूरक व्यवसाय आणि शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.



