आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी बँकेची ऐतिहासिक भागीदारी

0
19
आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी बँकेची ऐतिहासिक भागीदारी
आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी बँकेची ऐतिहासिक भागीदारी

आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी बँकेची ऐतिहासिक भागीदारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

मुंबई : आरबीएल बँक (RBL Bank) आणि संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) आघाडीची बँक एमिरेट्स एनबीडी (Emirates NBD) यांच्यातील ऐतिहासिक भागीदारी सोहळा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman या ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाल्या होत्या.

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा उल्लेख करत राज्यात देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे ४० टक्के गुंतवणूक येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे उद्योग, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात आकर्षक राज्य म्हणून उदयास आल्याचे त्यांनी नमूद केले.
आरबीएल बँक आणि एमिरेट्स एनबीडी यांच्यातील ही भागीदारी अरबी समुद्राच्या दोन्ही किनाऱ्यांवरील मजबूत अर्थव्यवस्थांमधील सहकार्याचे प्रतीक असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. या करारामुळे भारत आणि यूएई यांच्यातील आर्थिक, व्यापार आणि वित्तीय संबंधांना आणखी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही आरबीएल बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले. बँक आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात विविध विकासकामे आणि सामाजिक उपक्रम राबवत असून त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे.
भारत आणि यूएई यांच्यातील दृढ होत जाणारे संबंध देशाच्या विकासगाथेला नवी दिशा आणि गती देणारे ठरतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here