सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा 12 ऑगस्ट रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा २४ जून रोजी
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी ११ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असल्याची माहिती वित्त समितीचे सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ (Abhijit Pisal ) यांनी दिली.
या सभेमध्ये वित्त समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा असून आर्थिक बाबी, विकासकामांचा निधी, खर्चाचा आढावा तसेच विविध विभागांच्या आर्थिक प्रस्तावांवर विचारविनिमय केला जाणार आहे.
वित्त समितीचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी यांनी सभेस वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.