मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

0
47
मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे
मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

कणकवली येथे मच्छिमार संस्था, सहकारी सोसायट्या आणि प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मच्छिमार संस्था, सहकारी सोसायट्या आणि मच्छिमार प्रतिनिधींसोबत पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री  नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली येथे सविस्तर बैठक घेऊन मच्छिमारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

बैठकीत डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मच्छिमार बांधवांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, वाढता मासेमारी खर्च तसेच पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी मासेमारी बंदीचा कालावधी एकसमान ठेवण्याची मागणी मच्छिमार प्रतिनिधींनी मांडली. विविध मच्छिमार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगासमोरील अडचणींची माहिती देत शासनाकडून आवश्यक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मच्छिमार बांधवांच्या न्याय्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा केला जाईल आणि मच्छिमारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
बैठकीस रविकिरण तोरस्कर (Ravikiran Torskar), बाळा खडपे (Bala Khadpe), बुवा तेंडुलकर (Buva Tendulkar), विकी चोपडेकर (Vicky Chopdekar) , कृष्णनाथ तांडेल (Krishnanath Tandel), कांता कोइंडे, (Kanta Koinde), काका प्रभू(Kaka Prabhu), गौरव पारकर (Gaurav Parkar ), बापू जुवाटकर (Bapu Juvatkar), ज्ञानेश्वर खवळे (Dnyaneshwar Khawale ), अक्षय हरम (Akshay Haram ) , उल्हास मंचेकर (Ulhas Manchekar ), सचिन आरेकर (Sachin Arekar), उमेश आंबेरक (Umesh Amberkar) आणि  यांच्यासह विविध मच्छिमार संस्था व सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मच्छिमारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने शासनाकडून लवकरच ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here