देवगड – मुणगे  अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मुंबईत  ग्रामस्थांची एल्गार सभा; लालबाग येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
47
मुणगे अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मुंबईत ग्रामस्थांची एल्गार सभा; लालबाग येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुणगे अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मुंबईत ग्रामस्थांची एल्गार सभा; लालबाग येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड – मुणगे  अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात मुंबईत  ग्रामस्थांची एल्गार सभा; लालबाग येथील बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई/देवगड : पांडुशेठ साठम
देवगड तालुक्यातील मुणगे येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात रविवारी मुंबईतील लालबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबईत वास्तव्यास असलेल्या मुणगे आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
सभेत उपस्थित ग्रामस्थांनी अणुऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरण, मत्स्यव्यवसाय, शेती आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत आपली भूमिका मांडली. कोकण हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पट्टा असून येथे कोणताही विकास प्रकल्प राबविताना स्थानिकांची संमती आणि पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी विविध वक्त्यांनी कोकणातील जनतेने यापूर्वीही पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात एकजुटीने लढा दिल्याची आठवण करून दिली. मुणगे परिसरातील नागरिक, मुंबईस्थित चाकरमानी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयावर जनजागृती वाढवून लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
सभेत अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातील उपलब्ध माहिती, शासनाच्या प्रस्तावित धोरणांचा आढावा तसेच भविष्यातील आंदोलनाची दिशा यावर चर्चा करण्यात आली. स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरणीय मुद्दे शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने अलीकडेच राज्यात मोठ्या क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील संभाव्य स्थळांचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here