सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर - नितेश राणे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर – नितेश राणे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र पुरस्कृत नर्सिंग शिक्षण बळकटीकरणासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे.
या प्रत्येक महाविद्यालयाला प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला संलग्न बीएससी नर्सिंग महाविद्यालय नव्याने मंजूर झाले असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य शिक्षणाचे नवे दालन खुले झाले आहे.
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री तथा विद्यमान खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेबांनी केंद्र आणि राज्य सरकारला केलेल्या सततच्या पत्रव्यवहारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच गुणवत्तापूर्ण नर्सिंग शिक्षण व प्रशिक्षणाची संधी मिळणार असून, भविष्यात कुशल परिचारिका तयार होऊन जिल्ह्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या योजनेत समावेश झाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार !