राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ जाहीर

0
21
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ जाहीर
राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ जाहीर

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ जाहीर

१ जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा

मुंबई, दि. ___ : राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती तसेच कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय कृषी पुरस्कार २०२३ आणि २०२४ जाहीर केले आहेत.
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिली.
या सोहळ्यात राज्यपाल (जिष्णु देव वर्मा) Jishnu Dev Varma यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनवाढ, शाश्वत शेती पद्धती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन विकास तसेच कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, शेतकरी आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.
या पुरस्कारांमुळे कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच राज्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here