सुधारित कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मान्यवरांचा गौरव

0
16
सुधारित कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मान्यवरांचा गौरव

सुधारित कृषी पुरस्कार २०२३ व २०२४ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मान्यवरांचा गौरव

रत्नागिरी 
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सन २०२३ आणि २०२४ वर्षांसाठीचे विविध कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मान्यवरांची निवड झाली असून कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि त्यांच्या पत्नींचा १ जुलै २०२६ रोजी कृषी दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपाल Jishnu Dev Varma यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

सन २०२३ चे पुरस्कार

🔹 वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (रु. १.२० लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
ठाणे विभागातून डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई, ओणी, ता. राजापूर यांची निवड झाली आहे.
🔹 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) (रु. ४४ हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
अनंत बाबाजी खांबे, मांडकी, ता. चिपळूण यांना जाहीर झाला आहे.
सन २०२४ चे पुरस्कार
🔹 वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (रु. २ लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
ठाणे विभागातून आनंद जयंत देसाई, पावस, ता. रत्नागिरी यांची निवड झाली आहे.
🔹 वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (रु. १.२० लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
मैरुन हमीद नाकाडे, नेवरे, ता. रत्नागिरी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
🔹 उद्यान पंडित पुरस्कार (रु. १ लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
धनंजय श्रीकृष्ण केतकर, भिले, ता. चिपळूण यांची निवड करण्यात आली आहे.
🔹 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) (रु. ४४ हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र)
दयानंद बाबाजी चौगुले, खरवते-गावठाणवाडी, ता. राजापूर यांना जाहीर झाला आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. कक्षाधिकारी रुचिता पिंपळे यांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कृषी, फलोत्पादन आणि शाश्वत शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या मान्यवरांच्या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here