‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना प्रभावीपणे राबवा – मंत्री प्रा. अशोक वुईके

0
16
'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजना प्रभावीपणे राबवा - मंत्री प्रा. अशोक वुईके
'राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण' योजना प्रभावीपणे राबवा - मंत्री प्रा. अशोक वुईके

‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना प्रभावीपणे राबवा – मंत्री प्रा. अशोक वुईके

आदिवासी भागात महिला बचत गटांचे जाळे उभारा

मुंबई
राज्यातील आदिवासी महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच आदिवासी भागात महिला बचत गटांचे व्यापक जाळे उभे करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक वुईके यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
यावेळी मंत्री वुईके यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्थापन करण्यात येणारे आदिवासी महिला बचत गट हे ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) च्या धर्तीवर सक्षम, सुव्यवस्थित आणि कार्यक्षम असावेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून आदिवासी महिलांना स्वावलंबन, आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
या अभियानाला अधिक गती देण्यासाठी आणि स्थापन झालेल्या महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व प्रकल्प अधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव मच्छिंद्रनाथ शेळके उपस्थित होते. तसेच आयुक्त लीना बनसोड आणि अपर आदिवासी आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here