ओव्हरहेड उपकरण व पॉइंटमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची सकाळची सेवा विस्कळीत

0
46
पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू
पश्चिम रेल्वेचे नवीन उपनगरीय वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू

ओव्हरहेड उपकरण व पॉइंटमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची सकाळची सेवा विस्कळीत

मुंबई, दि. २६ : ओव्हरहेड उपकरणातील (OHE) बिघाड आणि चर्चगेट स्थानकावरील पॉइंटमधील तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. कार्यालयीन वेळेत झालेल्या या बिघाडामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर ते चर्चगेट दरम्यान सकाळी ६.०० ते ७.२२ या कालावधीत ओव्हरहेड उपकरणातील बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चर्चगेट स्थानकावरील पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक आणखी कोलमडले.
या दुहेरी बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या विलंबाने धावल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळेत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अनेक प्रवाशांना कार्यालयात वेळेवर पोहोचणे शक्य झाले नाही, तर काही ठिकाणी लोकल पकडण्यासाठी चढाओढही पाहायला मिळाली.
दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत दोन्ही तांत्रिक बिघाड दूर केले असून रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली आहे.
मात्र, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत बिघाडाबाबत स्थानकांवर वेळेवर घोषणा करण्यात आल्या नाहीत तसेच रेल्वे सेवेच्या स्थितीबाबत पुरेशी माहिती मिळाली नसल्याची तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here