सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे शनिवारी, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ‘शिवराज्याभिषेक गीता’ या विशेष गीतसंग्रहाचे लोकार्पण करण्यात येणार असून, त्यानंतर ‘शिवस्वराज्यगाथा’ या प्रेरणादायी गीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि प्रेरणादायी कार्याला गीतांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरिक, शिवप्रेमी, विद्यार्थी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.