MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल

0
24
MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल,राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार
MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल,राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार

MPSC परीक्षांमध्ये मोठे बदल

राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा, ऑनलाइन पद्धतीने होणार

मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार असून, राज्यसेवा, संयुक्त गट-ब आणि संयुक्त गट-क या प्रमुख स्पर्धा परीक्षा आता वर्षातून दोन ते तीन वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या तिन्ही परीक्षा संगणक आधारित ऑनलाइन (Computer Based Test – CBT) पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे उमेदवारांना वर्षातून अधिक संधी उपलब्ध होणार असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित होण्यास मदत होणार आहे. तसेच निकाल जाहीर करण्यास लागणारा कालावधी कमी होऊन भरती प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ऑनलाइन परीक्षा प्रणालीमुळे प्रश्नपत्रिका व्यवस्थापन, मूल्यांकन प्रक्रिया आणि निकाल जाहीर करण्यामध्ये कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक, ऑनलाइन पद्धतीची अंमलबजावणी आणि इतर मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here