मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची केली पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची केली पाहणी
पालघर, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि परिसरातील विविध पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढवण बंदर प्रकल्पाची संकल्पना, प्रस्तावित सुविधा, विकासाचा आराखडा तसेच प्रकल्पाच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर माहिती दिली. बंदर प्रकल्पासोबतच परिसरातील रस्ते, दळणवळण, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांचाही त्यांनी आढावा घेतला.
राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने वाढवण बंदर प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. प्रकल्पाची नियोजनबद्ध आणि वेळेत अंमलबजावणी करण्यावरही भर देण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात वनमंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. हेमंत सवरा तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.