धुळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पाला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश – मंत्री संजय शिरसाट 

0
12
धुळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पाला सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश - मंत्री संजय शिरसाट 

मुंबई, दि. ३० : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील देवपूर येथे प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालयाच्या उर्वरित इमारतीच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठक पार पडली.
धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील हरिजन सेवक संघ संचलित राजेंद्र छात्रालय वसतिगृह परिसरात उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी स्मारक व ग्रंथालय प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्मारकाचे काम नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रकल्पातील अडथळे दूर करून कामाला गती देण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here