विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) द्वारे मतदार यादी अधिक अचूक; पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणार

0
16

मुंबई, दि. ३० : मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक, विश्वासार्ह आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) द्वारे मतदार यादी अधिक अचूक; पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणार
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) द्वारे मतदार यादी अधिक अचूक; पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणार
या प्रक्रियेत विद्यमान मतदार यादीतील प्रत्येक मतदाराची पडताळणी करण्यात येते. यासाठी नियुक्त अधिकारी थेट मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहितीची खातरजमा करतात. यापूर्वी करण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातील (२००२-२००४ मतदार यादी) माहितीला आधार मानून ही प्रक्रिया राबविली जाते.
महाराष्ट्रात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकानुसार पात्र ठरणाऱ्या नागरिकांची मतदार यादीत नोंद करण्यात येणार आहे. नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी अर्ज क्रमांक ६ व आवश्यक घोषणापत्र भरून सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, विशेष सखोल पुनरीक्षणामुळे पात्र मतदारांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहण्यास मदत होते. तसेच मतदार यादीतील चुका दूर होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह बनते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here