रत्नागिरीतील उक्षीचे माजी सरपंच अनवर गोलंदाज यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
विकासाच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त
रत्नागिरी, दि. ३० : रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी गावचे माजी सरपंच अनवर गोलंदाज यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना महायुती सरकारच्या माध्यमातून कोकणात सुरू असलेल्या विकासकामांचा वेग आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी शिवसेनेशी जोडले जात असल्याचे सांगण्यात आले.
‘गावचा विकास आणि सर्वसामान्य जनतेची कामे’ हा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


