कुडाळ खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा १० जुलैला
कुडाळ खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा १० जुलैला
कुडाळ/मनोज देसाई
कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. या संस्थेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे ही सभा होणार आहे.
या सभेत संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच येणाऱ्या वर्षासाठीचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे, मागील वर्षाचा लेखाजोखा मांडणे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. सभासदांनी मोठ्या संख्येने वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन व्यवस्थापक नंदकिशोर करावडे आणि अध्यक्ष केशव नारकर यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.
कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ही तालुक्यातील शेतकरी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची संस्था आहे. खते, बियाणे, जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा संघामार्फत केला जातो. त्यामुळे वार्षिक सभेला सभासदांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते.