राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मध्य रेल्वेच्या दोन खेळाडूंची भारतासाठी निवड
मध्य रेल्वेसाठी अभिमानाची बाब म्हणजे मध्य रेल्वेचे दोन गुणवंत खेळाडू, श्री समरदीप सिंग आणि श्री तेजस शिरसे, यांची आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये मध्य रेल्वेच्या दोन खेळाडूंची भारतासाठी निवड
हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण मध्य रेल्वे परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताचा तिरंगा उंचावावा, देशाचे आणि मध्य रेल्वेचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा संपूर्ण मध्य रेल्वे परिवाराकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.