राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते 'अटल संस्मरण' ग्रंथाचे प्रकाशन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन
मुंबई, दि. ३० : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय तसेच सार्वजनिक जीवनातील आठवणींवर आधारित ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाले.
वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार म्हणून कार्य केलेले अशोक टंडन यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आले.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, “अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. भावी पिढीला नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता आणि नीतिमत्ता शिकायची असेल, तर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सार्वजनिक जीवनाचा अभ्यास करावा.”
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार तसेच ग्रंथाचे लेखक अशोक टंडन यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा, रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.