पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर २ जुलै जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना सुट्टी राहील.


