पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
पुणे, दि. २ : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटनेची अधिक सक्षम उभारणी आणि पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी नव्या कार्यकारिणीकडून प्रभावी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या निवडणुकीत योगेश बोरसे आणि किशोर बरकाले यांची उपाध्यक्षपदी, हिरा सरवदे यांची सरचिटणीसपदी, राहुल देशमुख आणि संजय सपकाळे यांची चिटणीसपदी, तर प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून सुशांत राऊत, ज्ञानेश्वर फड, उद्धव धुमाळे, अक्षय फाटक, तुषार झरेकर, गोपाळ गुरव, दीपक होमकर, मिलिंद शुक्ला, मनोज मोरे आणि सच्चिदानंद वाघमारे यांची निवड झाली आहे.
नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, पत्रकारांच्या हितासाठी संघटना अधिक सक्षमपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.