राष्ट्रीय छात्रसेना शिबिर, कोल्हापूर साठी ८ जुलै पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन.
राष्ट्रीय छात्रसेना शिबिर, कोल्हापूर साठी ८ जुलै पर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन
56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कार्यालयामार्फत सप्टेंबर ते डिसेंबर २०२६ पर्यंत एन.सी. सी भवन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आवार येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी प्रतिदिन सकाळी न्याहरी, चहा-बिस्किट, दुपारी जेवण, सायंकाळी चहा बिस्किट तसेच रात्री जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, प्रती दिन खर्चाचे दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
ही दरपत्रके ८ जुलैपर्यंत समादेशक अधिकारी, 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी.भवन यांच्याकडे पोहचतील अशा बेताने पाठवावीत.
अधिक माहितीसाठी :
56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी.भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक- 0231-2694582 ) येथे संपर्क साधावा.