पनवेलमधील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाला गती

0
20
पनवेलमधील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाला गती
पनवेलमधील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाला गती

पनवेलमधील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाला गती

मनपा व जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा

विद्यार्थीहिताला प्राधान्य; तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच अंतिम निर्णय

पनवेल | प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याबाबत आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पनवेल महापौर नितीन पाटील आणि रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विद्यार्थीहित लक्षात घेऊन हस्तांतरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यावर एकमत झाले.
बैठकीच्या सुरुवातीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत हा विषय प्रलंबित न ठेवता तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत शाळांच्या हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भातील प्रशासकीय, कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी शिक्षकांच्या हस्तांतरणाबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून, संबंधित नियमांचे पालन करून त्याबाबतही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय प्रश्न, शाळांमधील उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, मनपा सदस्य, डॉ. वैभव विधाते, रमेश चव्हाण, ललिता दहितुले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here