दशावतार कलेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध; कलाकारांना सहकार्याचे आश्वासन

0
16
दशावतार कलेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध; कलाकारांना सहकार्याचे आश्वासनदशावतार कलेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध; कलाकारांना सहकार्याचे आश्वासन
दशावतार कलेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध; कलाकारांना सहकार्याचे आश्वासन

दशावतार कलेच्या जतनासाठी शासन कटिबद्ध; कलाकारांना सहकार्याचे आश्वासन

प्रहार भवनात कलाकारांनी मांडल्या विविध समस्या; सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची ग्वाही

कणकवली | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे भेट देऊन त्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांची मांडणी केली. यावेळी कलाकारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना, दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि ओळख असून, या लोककलेचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
कलाकारांनी मानधन, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, युवा पिढीचा सहभाग आणि लोककलेच्या प्रचार-प्रसारासंदर्भातील विविध प्रश्न मांडले. यावर सकारात्मक चर्चा करत जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाच्या स्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास कलाकारांना देण्यात आला.
दशावतारासारख्या पारंपरिक लोककलेला अधिक बळ मिळावे आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here