पनवेल महापालिकेत ‘लोकशाही दिन’; नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

0
20
पनवेल महापालिकेत 'लोकशाही दिन'
पनवेल महापालिकेत 'लोकशाही दिन'

पनवेल महापालिकेत ‘लोकशाही दिन’; नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम; नागरिक-प्रशासन संवादाला चालना

पनवेल, दि. ६ जुलै : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व समस्या तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकशाही दिन’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमात नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारी व समस्यांवर सुनावणी घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब रातांबे तसेच सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद वाढावा तसेच नागरिकांच्या समस्या जलदगतीने निकाली निघाव्यात, यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिका स्तरावर ‘लोकशाही दिन’ आयोजित केला जातो.
लोकशाही दिनामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक तक्रारी किंवा अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे किमान १५ दिवस अगोदर सादर करावेत. तसेच, संबंधित अर्जदारांनी लोकशाही दिनाच्या दिवशी स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here