गडचिरोलीतील माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी

0
15
गडचिरोलीतील माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी
गडचिरोलीतील माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी

गडचिरोलीतील माओवादविरोधी अभियानात धाडसी कामगिरी

पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती

राज्य शासनाकडून विशेष गौरव; पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पिपिंग समारंभ संपन्न

मुंबई, दि. ६ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरी बजावणाऱ्या पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना (Assistant Police Inspector) राज्य शासनाच्या वतीने वेगवर्धित पदोन्नती (Accelerated Promotion) प्रदान करण्यात आली.
या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पिपिंग समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
माओवादविरोधी कारवायांमध्ये दाखविलेल्या शौर्य, कर्तव्यपरायणता आणि राष्ट्रसेवेबद्दल या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाने ही वेगवर्धित पदोन्नती जाहीर केली आहे.
यावेळी पदोन्नती प्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राज्याच्या सुरक्षेसाठी अशाच धाडसाने आणि निष्ठेने कार्य करत राहण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here