गणेशमूर्तींच्या माहेरघरावर पुराचा घाला! पूराच्या तडाख्यात पेणचे गणेशमूर्ती उद्योग उद्ध्वस्त

0
22

शेकडो मूर्ती वाहून, कारागिरांचे मोठे आर्थिक नुकसान

गणेशमूर्तींचे माहेरघर असलेल्या हमरापूर परिसरात पूराचा कहर; कारखाने पाण्याखाली

पेण (रायगड), दि. ७ जुलै :
गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील हमरापूर परिसराला अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक गणेशमूर्ती कारागिरांचे कारखाने पाण्याखाली गेल्याने तयार केलेल्या शेकडो गणेशमूर्ती वाहून गेल्या असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सवासाठी अनेक महिन्यांपासून सुरू असलेली मूर्ती बनविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आलेल्या पुरामुळे कारागिरांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक कार्यशाळांमध्ये पाणी शिरल्याने तयार मूर्ती, कच्चा माल तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पूराचे पाणी ओसरल्यानंतर नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले जाणार असून, प्रभावित मूर्तिकारांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पेण येथील गणेशमूर्ती उद्योगावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून, या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here