खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
18
खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराखडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्गाची शक्यता; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज

पुणे, दि. ७ जुलै :
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेपर्यंत धरण ३२ टक्के क्षमतेने भरले असून, पुढील २४ तासांत धरण ८० टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पर्जन्यमान आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा वाढता ओघ लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर नदीपात्रात उतरणे टाळावे, तसेच नदीकाठच्या परिसरात ठेवलेले साहित्य, जनावरे किंवा अन्य वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सखल भागातील नागरिकांना वेळेत सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन निरा देवघर प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, मालमत्ता व्यवस्थापन उपविभाग, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here