कासारसाई धरणातून दुपारी २ वाजता ३,८६० क्युसेक विसर्ग

0
19
कासारसाई धरणातून दुपारी २ वाजता ३,८६० क्युसेक विसर्ग
कासारसाई धरणातून दुपारी २ वाजता ३,८६० क्युसेक विसर्ग

कासारसाई धरणातून दुपारी २ वाजता ३,८६० क्युसेक विसर्ग

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरण ९३.४५ टक्के भरले; नदीपात्रात जाणे टाळण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

मावळ, दि. ७ जुलै :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कासारसाई धरण सध्या ९३.४५ टक्के भरले असून, धरणातील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आज दुपारी २ वाजल्यापासून सांडव्याद्वारे ३,८६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा विसर्ग करण्यात येत आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात, पुलांवर किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, गरजेनुसार विसर्गात बदल होऊ शकतो, अशी माहितीही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here