लोणावळा धरण १०० टक्के भरले; इंद्रायणी नदीत ३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

0
26
लोणावळा धरण १०० टक्के भरले
लोणावळा धरण १०० टक्के भरले

लोणावळा धरण १०० टक्के भरले; इंद्रायणी नदीत ३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

टाटा पॉवरकडून माहिती; विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

लोणावळा, दि. ७ जुलै :
मुसळधार पावसामुळे लोणावळा धरण १०० टक्के भरले असून, सांडव्याद्वारे इंद्रायणी नदीपात्रात सध्या ३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
टाटा पॉवर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरणातून होणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात किंवा सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here