रायगड आणि पालघरला आज पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
रायगड आणि पालघरला आज पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
भारतीय हवामान विभागाचा इशारा; अतिवृष्टीची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर
मुंबई, दि. ७ जुलै :
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, मंगळवारी रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिमुसळधार ते अति तीव्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके आवश्यक त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये तसेच प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.