केळूस येथे प.पू. सद्गुरू श्री नामदेव महाराज यांचा ९८ वा जन्मोत्सव सोहळा
केळूस येथे प.पू. सद्गुरू श्री नामदेव महाराज यांचा ९८ वा जन्मोत्सव सोहळा
१५ जुलै रोजी समाधी स्थानावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
केळूस, 6 जुलै:
प. पू. सद्गुरू श्री नामदेव महाराज यांचा ९८ वा जन्मोत्सव सोहळा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी केळूस येथील समाधी स्थानावर मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे. या निमित्ताने प.पू. नामदेव महाराज भक्त ट्रस्ट, केळूस-मुंबई यांच्या वतीने सर्व भाविकांना जन्मोत्सव सोहळ्याचा, समाधी दर्शनाचा, धार्मिक कार्यक्रमांचा, तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
बुधवार दि. १५ जुलै २०२६ – जन्मोत्सव सोहळा
सकाळी ८:३० ते १०:३० – समाधीवर अभिषेक व पाद्यपूजा
सकाळी १०:४५ ते १२:१५ – रखलनार्थ प्रासादिक भजन मंडळ, तेंडोली
दुपारी १२:१५ ते १२:३० – महाराजांची आरती
दुपारी १२:३० ते ३:३० – महाप्रसाद
दुपारी १:०० ते २:०० – प.पू. नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचे सुश्राव्य भजन
दुपारी २:०० ते रात्री ९:३० पर्यंत – आंदुर्लाई, विठ्ठल रखुमाई, म्हाळसाई, सिद्धेश्वर, तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळांची सुश्राव्य भजने
रात्री ८:०० व ८:३० वाजता – महाराजांची आरती
शनिवार दि. २५ जुलै २०२६ – आषाढी एकादशी
सायं. ४:०० ते ६:०० – प.पू. सद्गुरू श्री नामदेव महाराज भक्तमंडळ सिंधुदुर्ग यांचे भजन, हरिपाठ, नामस्मरण व आरती
बुधवार दि. २९ जुलै २०२६ – गुरुपौर्णिमा
सकाळी ८:०० ते रात्री १०:३० पर्यंत अभिषेक, भजन, महाप्रसाद व वारकरी भजनांचे कार्यक्रम संपन्न होतील.
कोकणातील वारकरी संप्रदायात नामदेव महाराजांना मानाचे स्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक या सोहळ्याला हजेरी लावतात. तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : समाधी स्थान केळूस
आपले नम्र, प.पू. नामदेव महाराज भक्त ट्रस्ट केळूस – मुंबई