बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक

0
23
बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक
बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक

बापर्डे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक

विभागीय समितीकडून तपासणी: ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

देवगड, 5 जुलै:
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींच्या विभागीय क्षेत्रीय तपासणी कार्यक्रमांतर्गत बापर्डे ग्रामपंचायतीची तपासणी कोकण विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
यावेळी जल जीवन मिशन सिंधुदुर्गचे प्रकल्प संचालक अभिषेक खंडेल, उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी केली. तपासणीदरम्यान सरपंच संजय लाड, पंचायत समिती सदस्या संजना लाड, उपसरपंच गुणावंत राणे तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप नाईकधुरे यांनी ग्रामपंचायतीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची समितीच्या सदस्यांसमोर मांडणी केली. बापर्डे पंचायतीचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके व विस्तार अधिकारी यांनी बापर्डे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांचे स्वागत केले.
स्पर्धेसाठी शुभेच्छा
तसेच बापर्डे ग्रामपंचायतीला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायती समोर सादर करताना अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांनी बापर्डे ग्रामपंचायतीच्या पारदर्शक, लोकाभिमुख आणि नियोजनबद्ध कामकाजाचे विशेष कौतुक केले.
गावाच्या सर्वांगीण विकासात महिला बचत गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शाश्वत विकासासाठी त्यांचा अधिक सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील अधिकारी आणि शिक्षकांनी गावाच्या विकासासाठी दर्जेदार सेवा देत राहावे असे मार्गदर्शन त्यांनी केले.
ग्रामस्वच्छतेचे कौतुक
पाणीवापर, पायाभूत स्वच्छता, लोकसहभाग आणि महिला शक्तीची एकजूट ही बापर्डे ग्रामपंचायतच्या यशाचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे संतोष पाटील, मनीष पडते, संदीप घवाळ, प्रवीण कणसेकर, नंदकुमार मोहिते तसेच विस्तार अधिकारी आरोग्य युसुफ अब्दुलकर उपस्थित होते.
बापर्डे येथील तपासणीनंतर अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे यांनी पंचायत समिती देवगड येथे स्वच्छता भेट दिली. गावातील समस्या गणेश राणे, उपसभापती अमोल लोके आदींसह संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. ग्रामपंचायतीच्या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समितीच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here