नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ८ जुलैला विधान भवनावर मोर्चा

0
27

मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते दि. बा. पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समिती आणि विविध भूमिपुत्र संघटनांच्या वतीने बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता विधान भवनावर भव्य पदयात्रा व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व रश्मीताई पोपटा करणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवळे (पवळे/पवळे स्टेशन परिसर) येथून होणार असून, त्यानंतर विधान भवनाकडे पदयात्रा काढण्यात येणार आहे.

संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या आवाहनात, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव मिळालेच पाहिजे” अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ही लढाई भूमिपुत्रांच्या अस्मितेची असून, लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here