कोकणातील कातळशिल्पांचे २०२९ पूर्वी डिजिटल दस्तऐवजीकरण पूर्ण करणार

0
26
कोकणातील कातळशिल्पांचे २०२९ पूर्वी डिजिटल दस्तऐवजीकरण पूर्ण करणार
कोकणातील कातळशिल्पांचे २०२९ पूर्वी डिजिटल दस्तऐवजीकरण पूर्ण करणार

कोकणातील कातळशिल्पांचे २०२९ पूर्वी डिजिटल दस्तऐवजीकरण पूर्ण करणार

संरक्षणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी
कोकणातील ऐतिहासिक आणि जागतिक वारसा ठरू शकणाऱ्या कातळशिल्पांचे माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचे काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
मंत्री शेलार यांनी सांगितले की, कातळशिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, तसेच वेगवेगळ्या देशांतील आणि राज्यातील तज्ज्ञांच्या सहकार्याने छायाचित्रण व ध्वनिचित्रण करून त्याच्या सर्वसमावेशक डिजिटल नोंदी तयार करण्यात येणार आहेत. हे महत्त्वाकांक्षी काम २०२९ पूर्वी पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.
याशिवाय, कोकणात कोणताही विकास प्रकल्प राबविताना पुरातत्त्व विभाग आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कातळशिल्प असलेल्या परिसरात कोणतेही काम होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कातळशिल्पांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अबाधित राखण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विकास आणि वारसा संवर्धन यामध्ये समतोल राखत पुढील कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here