७ जिल्ह्यांतील ५३२ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा
७ जिल्ह्यांतील ५३२ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा
पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील ५३२ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या माहितीनुसार, ही यादी प्रातिनिधिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्रतेनुसार इतर लाभार्थ्यांचाही समावेश टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा प्रशासन, सहकार विभाग अथवा अधिकृत शासकीय माध्यमांद्वारे आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.