दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांचे अभिवादन
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांचे अभिवादन
विकासकार्यांना उजाळा
बारामती प्रतिनिधी
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, अजित पवार यांचे विकासाभिमुख नेतृत्व, जनसेवेची निष्ठा आणि लोककल्याणाचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना व्यक्त केली.
या अभिवादन कार्यक्रमास खासदार पार्थ पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जय पवार, ऋतुजा पवार तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.