शासनाच्या अधिकृत माहितीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या WhatsApp Channel ला Follow करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, महत्त्वाचे निर्णय, जनहिताच्या सूचना आणि अधिकृत घडामोडी नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) नागरिकांना आपल्या अधिकृत WhatsApp Channel ला Follow करण्याचे आवाहन केले आहे.
या अधिकृत WhatsApp Channel च्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना, महत्त्वपूर्ण घोषणा, जनजागृती संदेश, शासकीय उपक्रम आणि ताज्या अधिकृत सूचना थेट नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या आवाहनानुसार, नागरिकांनी QR Code स्कॅन करून आजच अधिकृत WhatsApp Channel Follow करावा आणि केवळ अधिकृत स्रोतांद्वारे शासनाची विश्वासार्ह माहिती मिळवावी.
माहितीच्या युगात अफवा आणि अप्रमाणित संदेशांपासून दूर राहून अधिकृत माध्यमांचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.