प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन मुदतीत १०० टक्के पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

0
15
प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन मुदतीत १०० टक्के पूर्ण करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन मुदतीत १०० टक्के पूर्ण करा - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन मुदतीत १०० टक्के पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील SIR-२०२६ मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, अधिकारी सूर्यकांत पाटील, शितल जाधव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील नोंदींची शुद्धता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराकडून प्रगणना फॉर्म भरून घेऊन त्याची योग्य पद्धतीने नोंद करावी. कोणताही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मयत मतदारांची नावे नियमानुसार मतदार यादीतून वगळणे, नवीन पात्र मतदारांचा समावेश करणे आणि स्थलांतरित मतदारांच्या नोंदी अद्ययावत करणे या सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रत्येक टप्पा वेळेत पूर्ण करावा, तसेच डिजिटायझेशन करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि दैनंदिन प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
१०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या BLO चा सत्कार
यावेळी SIR-२०२६ मोहिमेअंतर्गत प्रगणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नितीन रावराणे, किशोर चौगुले, सुरेश लोके आणि ऋतुराज कदम यांचा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here